नवचैतन्य
प्रकाशनचं मिसेस लॉजिक हे श्री
आनंद ठाकूर यांनी
लिहिलेलं आइन रँड
या रशियन लेखिकेचं
संक्षिप्त चरित्र
आहे. आइन रँड
म्हणजे अॅटलास
श्रग्ड आणि द
फाऊंटनहेड या दोन
जग्द्विख्यात कादंबर्यांची लेखिका.
या दोनही कादंबर्यांचा अनुवाद मराठी
भाषेत प्रसिद्ध झाला
आहे. ऑब्जेक्टिव्हिझम या
संपूर्ण नव्या, स्वतंत्र आणि
जगावेगळ्या तत्त्वज्ञानाची मांडणी आईन रँड
हिने स्वतःच्या लेखनामधून
केली. तिची लेखनकारकीर्द
ही अवघ्या काही
कादंबर्यांची. तरीही एकंदर
इंग्रजी साहित्यामध्ये आईनचं महत्त्व अतुलनीय
असं आहे. केवळ
साहित्यातच नाही, तर एकूणच
तर्क, बुद्धिमत्ता, आणि
व्यक्तिवाद या संदर्भातले
तिचे विचार जगभरात
अभ्यासले जातात. अशा या
लेखिकेचा परिचय ठाकूर यांच्या
या छोटेखानी पुस्तकातून
होतो.
श्री आनंद ठाकूर
यांनी या पुस्तकाचे
तीन भाग केले
आहेत. पहिल्या भागात
अॅलिस रोझेनबाऊम
ऊर्फ आइन रँडचा
संघर्ष आणि उत्कर्ष,
दुसर्या भागात
तिच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि तिला
लाभलेले अनुयायी, आणि तिसर्या भागात
तिचं उतारवय आणि
अखेरची काही वर्षं
आली आहेत. अतिशय
कुशाग्र बुद्धीची ही मुलगी
लहानपणापासूनच सुस्पष्ट विचारांची होती.
एखादी नवीन कल्पना
समजून घेताना, नवा
विषय शिकताना, मानवी
मुल्यं आत्मसात करताना किंवा
नाकारतानाही तिच्या या गुणाचे
पुनःपुन्हा प्रदर्शन झालेले दिसते.
या सुस्पष्टतेमुळेच आपल्या
मैत्रिणी कशा असाव्यात,
कोणती पुस्तकं वाचावीत,
मोठ्या लोकांशी कसे बोलावे
याबद्दल ती जागरूक
होती. तल्लख ग्रहणशक्ती
असल्यामुळे तिच्या वयाच्या मुलींशी
मैत्री करणं तिला
नेहमीच अवघड जात
असे. नंतरच्या आयुष्यातही
तिच्या बहुतेक नात्यांबाबत हेच
दिसून आलं. लहान
वयापासूनच अवतीभवती स्वातंत्र्याचा संकोच
होताना पहिल्यामुळे तिच्या स्वातंत्र्याबद्दलच्या
कल्पना फार लवकर
नक्की झाल्या. इतकंच
नाही, तर प्रतिकूल
परिस्थिती असूनही तिच्या विचारांवर
आणि इच्छाशक्तीवर त्याचा
परिणाम तिने होऊ
दिला नाही. याचमुळे
रशियातून बाहेर पडून व्यक्तिस्वातंत्र्याचा
पुरस्कार करणार्या अमेरिकेत
स्थायिक व्हायचं हेही तिने
निश्चित केलं होतं.
इतकंच नव्हे तर
त्याप्रमाणे अथक कष्ट
करून ती अमेरिकेची
नागरिक झालीदेखील. हा सगळा
प्रवास या पुस्तकातून
वाचता येतो.
आइन रँड या
लेखिकेच्या लेखनाची, व्यक्तिमत्त्वाची अनन्यसाधारण
अशी वैशिष्ट्यं होती.
तिने संपूर्णपणे स्वतंत्र
असं व्यक्तिवादी तत्त्वज्ञान
निर्माण केलं. ती तिच्या
संपूर्ण आयुष्यभर ते तत्त्वज्ञान
स्वतः आचरणात आणत
राहिली. इतकंच नाही, तर
तिच्या प्रत्येक लेखनातून तिने
त्याचा पाठपुरावा केला. विशेष
म्हणजे यासाठी तिने ललितलेखनाचा
साचा निवडला, क्लिष्ट
होऊ शकेल असं
आपलं तत्त्वज्ञान तिने
कादंबरीतल्या पात्रांमधून, त्यांच्या संवादांमधून मांडलं.
हेच नव्हे तर
तिच्या कादंबर्यांवर सिनेमेही
प्रदर्शित झाले. तिचं लेखन
करोडो लोकांपर्यंत पोहोचवण्यात
या गोष्टीचा फार
मोठा वाटा आहे.
तिच्या कादंबर्यांनी, विशेषतः
द फाऊंटनहेड यातल्या
मुख्य पात्राने अनेकांना
जगण्याचा दृष्टीकोन दिला, त्यांच्या
आयुष्याबद्दलच्या संकल्पनांमध्ये आमुलाग्र बदलही घडवला.
आदर्शवाद आणि व्यवहार
हे एकाच नाण्याच्या
दोन बाजू आहेत,
व्यक्ती ही जगातली
मूलभूत संस्था असून तिच्या
हिताला बाधा आणणे
समाजासाठी नुकसानकारक आहे, असे
क्रांतिकारक विचार आईनने जगात
रुजवले. अशी ही
एकमेवाद्वितीय म्हणावी अशी लेखिका
घडली कशी, जगली
कशी हे कुतूहल
शमवण्याचं काम ठाकूर
करतात. तर दुसरीकडे
ज्यांनी तिची पुस्तकं
अजून वाचली नसतील,
अशा वाचकांच्या मनात
कुतूहल जागं करण्याचं
कामही ते करतात.
केवळ स्वतःच्याच संकल्पनांवर पराकोटीचा
दृढविश्वास असणार्या आईनने
मानवी नातेसंबंध, त्यांच्यामध्ये
असलेलं भावनांचं स्थान याला
फारसं महत्त्व दिलं
नाही. याचमुळे उतारवयात
तिच्या सगळ्याच नात्यांमधून ती
एकटी पडत गेली,
नाकारली गेली. सार्वजनिक आयुष्यात
अनेक शिष्य, प्रशंसक
मिळूनही खाजगी आयुष्यात मात्र
ती बहुधा एकटीच
राहिली. आईन रँड
हिचा प्रभाव हा
फक्त वाचकांपुरता मर्यादित
नव्हता. तिचं तत्त्वज्ञान
एखाद्या पंथाप्रमाणे स्वीकारून त्याचा
अंगिकार करणार्या अनुयायांचाही
यात समावेश होता.
मिसेस लॉजिक या
पुस्तकामध्ये या घटनांबद्दल
मात्र फारच मोजकी
माहिती येते. आईन रँड
हिच्या हयातीतच या सगळ्यातून
उभी राहिलेली चळवळ
आणि तिची व्याप्ती
याची पूरेपूर क्ल्पना
देण्यात हे पुस्तक
किंचित कमी पडतं.
त्याचबरोबर काहीशी रुक्ष विचारसरणी
असलेल्या आईनने लेखनासाठी कादंबरीसारखा
रंजक साहित्यप्रकार का
निवडला असावा, हा प्रश्नही
अनुत्तरित राहतो.






0 comments:
Post a Comment